शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ एप्रिल) :- नवीन पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विद्यार्थीदशेत तसेच संपूर्ण आयुष्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड शहरातील माजी स्वीकृत सदस्य अनिकेत काटे यांच्या वतीने एक अनोखे अभियान राबविण्यात आले या अभियाना अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती कशी साजरी करावी याचा अनोखा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे कार्य असून त्यांना खरे अभिवादन हे अभ्यासातून देणे योग्य ठरेल. कारण सलग १८ तास बाबासाहेब अभ्यास करायचे. विद्यार्थ्यांमध्येही याच प्रकारे बाबासाहेबांकडे असणारे अभ्यासाचे गुण तसेच एकाग्रता उतरावेत, त्यांना ते किती वेळ अभ्यास करू शकतात, याचे मर्यादा मूल्यमापन कळावे. युवा पिढीही मोबाईलपासून लांब राहवू शकते हे सर्वांना कळावे, यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला त्यांचे अनिकेत काटे यांनी कौतुक आणि अभिनंद केले. ह्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने देशातील हजारो लाखो विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करून अशाप्रकारे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करून तरुण पिढीला एक नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अशा मुलांचा त्यांच्या आईवडिलांनाच नाही तर समाजालाही त्यांचा अभिमान वाटेल असे कार्य या मुलांनी आज करून दाखवले. असे अनिकेत काटे म्हणाले. व भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. विरोधी पक्षनेते, पिं.चिं मनपा राजाभाऊ काटे, ज्ञानराज सर, निखिल सर, विद्याताई गायकवाड व सर्व विध्यार्थी मित्र उपस्थित होते.