शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ एप्रिल) :- गुजर वस्ती येथील कांतीलाल खिवंसरा पाटील जलतरण तलाव तात्काळ सुरु करावा, अशी मागणी मा. नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २४ गुजर वस्ती थेरगाव येथील कांतीलाल खिवंसरा पाटील जलतरण तलाव गेल्या दोन वर्षापासून बंद असून एप्रिल महिन्यात तापमान वाढत आहे. उन्हापासून दिलासा देणारे थेरगावातील सदर जलतरण तलाव दीर्घकाळापासून बंद आहे. त्यामुळे जलतरण खेळाडूंसह नागरिक व मुलांची गैरसोय होत आहे, कोरोनाचे निर्बंध उठवून तलाव सर्वांसाठी खुले करणे आवश्यक असताना ते अद्याप बंद अवस्थेत आहे. सोबतच क्रीडा विभाग त्याकडे कदाचित जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
उन्हाळ्यात दरवर्षी सुमारे चार ते पाच हजार नागरिक जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. परीक्षाकाळ संपल्यावर जलतरण शिकावे म्हणून तलावात गर्दी होते. तरी गुजर वस्ती येथील कांतीलाल खिवंसरा पाटील जलतरण तलाव तात्काळ सुरु करावा, असेही सदर निवेदनात मनीषा पवार यांनी नमूद केले आहे.