शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- विश्वकल्याणाच्या अंतिम उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या, आनंदी येथील विश्वशांती प्रतिष्ठान संस्थेच्या मुख्य सल्लागारपदी विश्वमहात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव श्री.अशोक पवार यांनी जाहिर केले आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या 725 व्या वर्षीचे औचित्य साधून डाॅ.घाणेकर यांची नियुक्ती केली असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह 17 देशात विश्वजोडो अभियान राबविले आहे. डाॅ.घाणेकर हे दत्तोपासक असून
डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठाचे संस्थापक, अध्यक्ष आहेत. डाॅ.घाणेकर यांनी पहिल्या प्रवचनकार परिषदेचे अध्यक्षपद भूषविले असून त्यांनी नेपाळ, न्यूझीलंड येथे प्रवचने दिली आहेत. अध्यात्म आणि ज्योतिष विषयक त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या नियुक्तीबद्दल, समर्पण संस्थेच्या सचिव सौ.प्रतिमा अरुण काळे, सप्तस्वर इंटरनॅशनलचे सचिव विश्वास धोंगडे, वर्ल्ड व्हिजनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे, अक्षरआनंद इंटरनॅशनल चे संस्थापक आणि अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी, मधुरंग संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदा नाईक, भारत बेल्जियम मैत्रीसंघाच्या अध्यक्षा सौ.प्रिती दबडे, फोटो वर्ल्डच्या सचिव सौ.जयश्री शेंडे, महिला.ज्योतिर्विद संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष डाॅ.सविता महाडिक, त्रिमूर्ती फिल्म्सचे मुख्य निमंत्रक श्री.मिलिंद पानसरे, इंटरनॅशनल पोएटस.च्या मुख्य समन्वयक कोमल माळी तसेच सहनिमंत्रक ऋचा कर्वे यांनी डाॅ.घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.