शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त विदयानगर चिंचवड़ येथे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र मा.विशाल बाळासाहेब काळभोर व शिवसेना मा.नगरसेवक मा.रामभाऊ पात्रे यांच्या संयोज़नाने पाणपोईचे उद्घाटन सभारंभ आज संपन्न झाले.
या वेळी उद्घाटनास प्रमुख उपस्थिती मा.नगरसेविका सौ.वैशालीताई काळभोर, मा.दिलीपभाऊ दातीर पाटील, मा.दत्ताभाऊ देवतरासे, मा.राहुल उर्फ़ चिंटूभाऊ दातीर पाटील, मा.मनीषभाऊ काळभोर, मा.सचिन सकाटे, शिवसेना विभाग प्रमुख मा.सय्यद पटेल, जेष्ठ शिवसैनिक मा.रामभाऊ उत्तेकर, जेष्ठ शिवसैनिक मा.सुभाष कांबळे, मा.विश्वनाथ पात्रे, मा.नारायण सजगने, उपविभाग प्रमुख मा.अंकुश पात्रे, मा.विट्ठलराव कळसे, मा.विठ्ठलराव माने RPI, शाखा प्रमुख मा.गंगाधर काळे, मा.रविंद्र साळवे, मा.विक्रम गायकवाड, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा.प्रीतम तेलंग शाखा प्रमुख व शिवसेना शाखा प्रमुख मा.अरुण पात्रे यांनी केले यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा मित्र मोठया संखेत उपस्थित होते.