शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातील डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली. तसेच आमदार जगताप यांचे बंधू विजय जगताप, शंकर जगताप यांच्याशी चर्चा करून धीर दिला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज केले जाणार होते. पण, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व आताचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम रद्द केले.
यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल यावेळी उपस्थित होते.
Advertisement