शबनम न्यूज : आळंदी (दि.१६ एप्रिल) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, (आळंदी), जि. पुणे या ठिकाणी सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य,महात्मा ज्योतिबा फुले व महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर मा.डॉ.पांडुरंग मिसाळ, सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग- प्रमुख , प्रा.संजीव कांबळे – परीक्षा विभाग- प्रमुख, प्रा. कैलास अस्तरकर -कला शाखा विभाग -प्रमुख, प्रा.माणिक कसाब -राज्यशात्र विभाग प्रमुख यांची उपस्स्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी पाहुण्यांचा परिचय कला शाखा विभागप्रमुख प्रा.कैलास अस्तकर यांनी करून दिला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे, मराठी विभाग, व सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ.पांडुरंग मिसाळ यांनी समाजासाठी महान आणि उदात्त कार्य करणाऱ्या तसेच जगाच्या कल्याणासाठी देह झिजविणाऱ्या व्यक्तीला महात्मा म्हणतात. असे मत व्यक्त करीत. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांचे जीवन व कार्य याचे सविस्तर विवेचन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना महाड चवदार तळ्याचा संघर्ष तसेच काळाराम मंदिर संघर्ष यासंदर्भात लेखाजोखा मांडला. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे ‘ महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण’ हे ब्रीदवाक्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समाज कार्याशी कसे मिळते जुळते असून महात्मा फुले यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी कशी स्पष्ट होते याबाबत विचार व्यक्त करीत त्याच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात आणि मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीव कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले. तसेच उपस्थितांचे, आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.शैला वाळुंज, प्रा.डॉ. छाया जोशी, प्रा. सीमा साळुंखे, प्रा.विकास दिघे, प्रा.यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. सोनाली अभंग, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. डॉ. राजू शिरसकर व शरदचंद्र पवार महाविद्यालय व रामचंद्र पाटील आवटी जुनियर कॉलेजचे, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.