शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वांचे लाडके आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांच्यावर बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लक्ष्मण जगताप यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या लाडक्या आमदारांनी लवकर बरे व्हावे, परत पूर्वीसारखे कार्यरत व्हावे, याकरिता त्यांचे चाहते विविध धार्मिक स्थळावर प्रार्थना करीत आहेत आमदार लक्ष्मण जगताप यांना दीर्घायुष्य लाभो, याकरिता अनेक कार्यकर्ते,चाहते देवाकडे साकडे घालत आहेत.
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे स्वास्थ लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रतिभा महिला प्रतिष्ठाण व मुक्तांगण महिला प्रतिष्ठाण तर्फ ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर (पिंपळे गुरव) येथील मंदिरात अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप महिला भगिनीन कडून सुरू करण्यात आला.
यामध्ये सौ.शुभांगीताई जगताप,सौ.माई ढोरे,सौ.उषाताई मुंढे,सौ.कावेरी सं जगताप,सौ.पल्लवी जगताप,सौ.सुषमा कदम,सौ.माधवी राजापुरे,सौ.वैशाली जवळकर,सौ.शोभा जांभुळकर,सौ.रविना आंगोळकर,सौ.उर्मिला देवकर. वैजंता काशिद यांनी तसेच अनेक महिलांनी सहभाग घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी प्रार्थना केली.