वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.१८ एप्रिल) :- आयपीएल 2022 च्या मोसमात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. दिल्ली संघाच्या फिजिओनंतर संघातील आणखी एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दिल्ली संघाला पुण्याला येण्या पासून रोखण्यात आले असून संघातील सर्व सदस्यांना मुंबईतच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिल्लीचा पुढचा सामना 20 एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध पुण्यात खेळायचा आहे. मात्र, या सामन्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
16 एप्रिल रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मात्र, त्याच्याशिवाय कोणत्याही खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यानंतर १६ एप्रिलला दिल्लीचा संघ बेंगळुरूविरुद्ध मैदानात उतरला. दरम्यान, खबरदारी म्हणून त्या सामन्यात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना एकमेकांना मिठी मारण्यास आणि हस्तांदोलन करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते. पण आता पुन्हा दिल्ली संघासाठी एक वाईट बातमी समोर आली असून संघातील खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे.
कडक बायोबबल असूनही दिल्ली टीममधील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. 20 एप्रिल रोजी दिल्लीची पुढची मॅच आहे. तोंडावर मॅच असताना खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने दिल्ली टीमचं टेन्शन वाढलं.