‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’चा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.१८ एप्रिल) :- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आकार ‘ पुणे प्रस्तुत ‘ राग माला…. एक रत्नमाला ‘ हा कार्यक्रम शनिवार, २३एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
मुलतानी ते भैरवीतील छोटया बंदिशी मधून नायक – नायिकेच्या प्रथम भेटीपासून मिलनापर्यंतचा प्रवास या कार्यक्रमाद्वारे सादर होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना , संकलन आणि दिग्दर्शन महेश पाटणकर यांचे आहे. अश्विनी कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी , भाग्यश्री गोडबोले , महेश पाटणकर हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११९ वा कार्यक्रम आहे.