शबनम न्यूज : पुणे (दि.१९ एप्रिल) :- भारतीय महिलांच्या उध्दारासाठी जीवन समर्पित करणा ऱ्या स्त्री उध्दारक, विदुषी पंडिता रमाबाई यांच्या १६४ व्या जयंतीनिमित्त पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ( केडगाव ) यांच्या वतीने पुण्यात २३ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती अॅड. मार्कस देशमुख ,अनुपमा सायलास , डॉ.महेंद्र चित्रे यांनी दिली.
हा कार्यक्रम वाय एम सी ए सभागृह ( क्वार्टर गेट ) येथे २३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. डॉ लॉरेन फ्रान्सिस ( संचालक, पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ) यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पंडिता रमाबाई यांच्या ‘माझी साक्ष ‘ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे. पंडिता रमाबाई यांच्या जीवनावर डॉ अतुल अघमकर हे बोलणार आहेत. पंडिता रमाबाई यांच्या विचारांमुळे ज्यांच्या जीवनात परिवर्तन घडले, अशा महिला, युवती मनोगत व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.