शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० एप्रिल) :- पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मानलेल्या भावानेच महिलेच्या अल्ववयीन मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर केले आहे . ही घटना मागील पाच ते सहा महिन्यांपासून काळेवाडी येथे घडली.
पिडीत मुलीच्या आईने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस सुरेश अहिवळे (वय-25 , रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणे होत होते. त्याने फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलीसोबत जवळीक साधून तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. याबाबत घरात कुणाला सांगितले तर मुलीच्या आई वडिलांना मारून टाकण्याची आरोपीने धमकी दिली. अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.