शबनम न्यूज : पुणे (दि.२० एप्रिल) :- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे यांनी पत्रकाद्वारे दिली.
हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गांधी भवन, कोथरूड येथे होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील , सर्व धर्मिय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये माहेर संस्थेच्या ल्यूसी क्युरीयन, स्नेहसदन चे फादर रॉबर्ट, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे तसेच संजय आवटे , निकोल पवार ( सचिव, माहेर संस्था ), मुख्तार मणियार, नुरु पटेल, नवाझ खान, जमीर पटेल, असरार खान उपस्थित राहणार आहेत.
*कार्यक्रमामागची भूमिका*
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गांधी भवन मध्ये रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू- मुस्लिम ऐक्य, सर्वांना रोजगार आणि जातीनिर्मूलन हे गांधीजींनी सांगितलेले भारतीय राष्ट्रवादाचे तीन आधार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि एकमेकांच्या सण उत्सवात आनंदाने सहभागी होणे, हे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे आहे. दिवाळी, रमजान त्यासंदर्भातले तीन प्रमुख सण आहेत, ज्यात प्रत्येक भारतीयाने सहभाग घेतला पाहीजे. राष्ट्राची एकता नाताळ हे आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधूता निर्माण करण्याचा संकल्प भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्या संकल्पाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या रोजा इफ्तार कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात रोजा म्हणजे दिवसभराचा उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बंधू-भगिनी गांधी भवनमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता येतील. , आज देशामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी काही राजकीय शक्ती अफवा, गैरसमज आणि असत्य पसरवत आहेत. त्याला बळी पडलेले लोक ठिकठिकाणी हिंसाचार करीत आहेत. या गंभीर • वास्तवाचे भान ठेवून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचे मुल्य बळकट करायचे आहे. म्हणून अधिक उत्साह आणि जोमाने या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल ने केले आहे.