शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२१ एप्रिल) :- चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस याठिकाणी गुरुवार दि.२१ नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज संघटनेचे विभागीय सचिव देवदास देवकर यांच्या वतीने संघटने मार्फत कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी लवकर त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी,ते लवकर बरे होऊन घरी यावे यासाठी पिंपरी चिंचवड मधील सर्व टपाल कर्मचारी तर्फे परमेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी संघटनेचे राजुशेठ करपे सर्कल सेक्रेटरी नॅशनल युनियन ऑफ ग्रामिण डाकसेवक,काळूराम पारखी सहसचिव महाराष्ट्र सर्कल नॅशनल असोशीएन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज,देवदास देवकर रिजनल सेक्रेटरी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज,रमेश कांबळे पोस्टमास्तर चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस,विष्णु गायकवाड डिव्हीजन सेक्रेटरी नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक,संतोष पवार,रमेश वाळुंज, जयदेव थोरात,महंमद शेख,अलिम महालदार,अशोक अवघडे,सतीश जगताप,मोहन जोशी,संदेश गायकवाड,सुयोग तटकरे, दीपक गायकवाड,विठ्ठल शिंगारे, कारभारी शिंगुरे,वैजनाथ चव्हाण,रमेश गडप्पा,उल्हासराव कारंडे,गणेश कोडपे,गजानन मिलिंद,कृष्णा केंगार,कपिल हणमंते,गजानन अनपलवर,ज्ञानेश्वर देशमुख,व सुवर्णा मदने,निकिता महंकाळ,शीतल नागवे शेळके,अंकिता पाटील इत्यादी संघटनेचे प्रतिनिधी व पिंपरी चिंचवड मधील पोस्टल कर्मचारी उपस्थित होते.