शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ एप्रिल ) :- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये जागतिक पुस्तक दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या ग्रंथालयात यानिमित्त भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भेट दिली. याप्रसंगी बोलताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले की, पुस्तकांचे आयुष्यातील महत्व अनन्यसाधारण आहे, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्वाची जी योग्य घडण अपेक्षित असते त्यासाठी पुस्तकांची मोलाची मदत होते.विद्यार्थ्यानी अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकांव्यतिरिक्त अन्य विविध प्रकारची पुस्तके विशेषतः विविध क्षेत्रातील महान व्यक्तींची आत्मचरित्रे आवर्जून वाचायला हवीत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी यशस्वी संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे, संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा यांच्यासह सर्व प्राध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.