शबनम न्यूज : पुणे (दि.२६ एप्रिल) :- कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी सार्थक ठरवित बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडूरंग बालवडकर यांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून नातीच्या जन्माचे जंगी स्वागत करण्याचे योजिले असून मांजरी फार्म शेवाळवाडी, पुणे येथून पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथील निवास स्थानी नातीला चक्क हेलिकॉप्टरने घरी घेवून येणार आहेत. हा नातीच्या स्वागताचा कार्यक्रम पाटील वस्ती, बालेवाडी, पुणे येथे आज दिनांक 26/4/2022 रोजी सांयकाळी 4.00 वाजता होणार आहे.