पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकांच्या निवडणूका दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वतीने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत पिंपरी-चिंचवड शहरातील आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे की , महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दोघे ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते आणि फक्त एकमेकांवर चिखलफेक करत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश हा नाकारता येणार नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे ही आम आदमी पार्टीची मागणी पहिल्यापासून राहिली आहे आणि या पुढे ही राहील.
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरात सर्व जागा लढविणार
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीसंदर्भात आम आदमी पार्टी तयार आहे आणि सर्व जागा लढवविणार आहे. , आप महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असून लोकांना अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्यावर आधारित दिल्ली मॉडेल मनात भरले आहे आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडकर याची मागणी करत आहे. लोकांच्या मनातच आप असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप चांगली कामगिरी करेल आणि जनतेचे खरे नगरसेवक पालिकेत रुजू होतील अशी आम्हाला खात्री आहे.