एकेकाळी दारूच्या व्यसनात अडकलेले मद्यपी आता एकत्र येऊन स्वतः आणि अन्य दारुड्यांना दारूपासून दूर राहण्यास मदत करतात. अशा या अनोख्या जागतिक संस्थेचे नाव आहे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस. 1935 साली अमेरिका येथे या संस्थेची स्थापना झाली. दोन मद्यपी: एक शेअर दलाल आणि दुसरे डॉक्टर हे दारूच्या व्यसनात अडकलेले होते. या दोघांनाही या व्यसनातून बाहेर पडायची इच्छा होती पण मार्ग सापडत नव्हता. जेव्हा त्यांना समजलं की अशी समान समस्या असलेले मद्यपी एकत्र येऊन एकमेकांना या मद्यपीडेपासून दूर ठेवू शकतात तेव्हा त्या कल्पनेतून अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस या संस्थेचा जन्म झाला. आज जवळपास 180 पेक्षा अधिक देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि लाखो मद्यपीडित या संस्थेच्या माध्यमातून मद्यमुक्त, सुखी, आनंदी आणि उपयुक्त जीवन जगत आहेत.
या संस्थेच्या पिंपरी येथे कार्यरत असलेल्या नवजीवन समूहाने नुकतीच 34 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने 30 एप्रिल 2022 रोजी रात्री विशेष नाईट विजील सभा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून बरेच सारे सभासद या कार्यक्रमास उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस संस्थेचे अनेक समूह सध्या कार्यरत आहेत. मद्यपीडित लोकांना ते विनामूल्य निस्वार्थी मदत करीत आहेत. एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ! या पंक्तीनुसार या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये तीन हजारांहून अधिक सभासद आज दारूपासून मुक्त आहेत आणि चांगले जीवन जगत आहेत. या संस्थेचे समूह भारतात तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थेचे सभासद होण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही, कोणतीही सक्तीची वर्गणी नाही. फक्त दारू सोडण्याची इच्छा असली पाहिजे.
जर आपणास दारू ही समस्या असेल किंवा आपल्या कुटुंबियांपैकी, परिचितांपैकी कोणाला ही समस्या असेल तर विनामूल्य मदतीसाठी नक्की संपर्क करा.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस
नवजीवन समूह, पिंपरी
9822326473 / 8888128883
पिंपरी-चिंचवड हेल्पलाईन: 9404402021
पुणे हेल्पलाईन: 9049457757
इंडिया हेल्पलाईन: 9022771011
जर आपणास दारू ही समस्या असेल किंवा आपल्या कुटुंबियांपैकी, परिचितांपैकी कोणाला ही समस्या असेल तर विनामूल्य मदतीसाठी आपल्या जवळच्या अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस संस्थेच्या समूहाला नक्की संपर्क करा.