शबनम न्युज | पुणे
श्रेयश मिलिंद जोशी (वय.४ रा.रावेत, पुणे) या चिमुकल्याने अवघ्या तीन वर्ष ११ महिने २४ दिवसांचा असताना इंडिया आणि आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले आहे.
अवघ्या २९ सेकंदात वेगवेगळे नवीन चार चाकी वाहनांची २६ मॉडेल्स इंग्रजी मुळाक्षरांच्या क्रमानुसार ओळखून दाखविण्याचा विक्रम केला आहे. श्रेयस ने प्रत्येक मॉडेल ओळखण्यासाठी घेतलेला कमी कालावधीमुळे त्याने विक्रमाला गवसणी घातली आहे त्याने ४८ देशांमधून पुढे येत हे यश संपादन केले. या यशासाठी आई-बाबा, दोन्ही आजी आजोबा, आत्या, मामा, डॉ. प्रिया भाले, काका-काकू यांनी मेहनत घेतली.
Advertisement