शबनम न्युज | पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था)
पुणे जि. को-ऑप.हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनच्या पिंपळे सौदागर शाखेच्या वतीने शनिवार दि.०७/०५/२०२२ रोजी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन यांच्या सौजन्याने सहकार दरबाराचा सुवर्ण महोत्सव साजरा केला .
प्रमुख पाहुणे म्हणून सहकार आयुक्तअनिल कवडे (आयएएस) यांच्यासह महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन,जिल्हा उप-निबंधक नारायण आघाव,पिंपरी चिंचवड परिसर (पुणे ३) उपनिबंधक नवनाथ अनपट उपस्थित होते . माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
महावितरणचे सहायक अभियंता सुजित ननावरे हेही रहिवासीयांच्या वीज पुरवठा संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित होते .महासंघाचे पिंपळे सौदागर शाखेचे प्रमुख श्री .चारुहास कुलकर्णी यांनी सहकार दरबाराचे सूत्रसंचालन केले . या सहकार दरबारच्या माध्यमातून को.ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भातील विविध प्रश्न जसे की डीम्ड कन्व्हेयन्स ड्राइव्ह , प्रॉपर्टी कार्ड ड्राइव्ह आदी विविध ड्राइव्ह इ. विविध प्रश्नांवर सोसायटीमधील उपस्थित रहिवासीयांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन यांनी फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेतला आणि सांगितले कि फेडरेशन “फ्रेंड , फिलोसोफर आणि गाईड ” म्हणून कार्य करत आहे .
गृहनिर्माण संस्थां व अपार्टमेंट प्रतिनिधींना संबोधित करताना राज्याचे सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे यांनी सांगितले कि कोणत्याही गृहनिर्माण संस्थेने कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते . उप विधींचे पालन करा व सभासदांकडून योग्य सहकार्याची अपेक्षा करा. त्यांनी तंटामुक्त सोसायट्यांवर भर दिला आणि सहकार्याचे सूत्र कोणीही विसरू नये अशी सूचना केली . पदाधिकाऱ्यांनी आपले काम निष्ठेने,प्रामाणिकपणे आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून करावे तर सभासदांनी त्यांच्या कामाचा आदर करावा . सोसायट्यांच्या कन्व्हेयन्स किंवा डीम्ड कन्व्हेयन्स वरही त्यांनी भर दिला . ५५ ते ६० टक्के सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही आणि या परिस्थितीमुळे भविष्यात सदस्यांसाठी अडचण निर्माण होईल,जी त्यांना लक्ष्यात येत नाही,असे त्यांनी सांगितले .
श्री.शत्रुघ्न काटे यांनी आपल्या मनोगनात गेल्या १० वर्षात पिंपळे सौदागर येथे झालेल्या विकासाचे चित्र स्पष्ट केले . आपल्या “नागरी संवाद” मोहिमेदरम्यान पिंपळे सौदागर मधील जवळपास सर्व गृह निर्माण सोसायट्यांना भेटी देऊन आपण त्यांच्या समस्या समजावून घेतल्या अशी माहिती हि दिली . त्यांनी सांगितले को सोसायटी व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे महासंघाचे श्री.चारुहास कुलकर्णी यांच्याकडे ते पाठवत असत .सर्व सोसायट्यांनी फेडरेशनच्या शाखा कार्यालयाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले .
महावितरणाचे सहायक अभियंता श्री.सुजित ननावरे यांनी वीज पुरवठा लाईन मध्ये दोष कसा निर्माण होतो आणि वेळ किंवा अगदी ड्युटीची वेळ न पाहता लवकरात लवकर ते दूर करण्यासाठी त्यांच्याकडून कोणते प्रयत्न केले जातात याची माहिती त्यांनी दिली . सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची आणि वीज पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्याची प्रणालीही त्यांनी स्पष्ट केली . सुरक्षा ठेव आणि पुरवठ्यावरील इतर मुद्द्यावर त्यांनी रहिवासीयांच्या प्रश्नांची उत्तरे दिली .
त्यानंतर श्री.सुहास पटवर्धन यांनी प्रश्नोत्तरांचे सत्र घेतले . त्यांनी उपस्थित सदस्यांनी विचारलेले लेखी प्रश्न घेऊन त्यांना उत्तर दिली . त्यांनी मालमत्ता पत्रक, पुनर्विकास,अभिहस्तांतरण , थकबाकी वसुली,निवडणूक प्रक्रिया आदी विषयांवर विस्तृत माहिती दिली . श्री.शत्रुघ्न काटे यांनी स्मार्ट सिटी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली .
दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सहकार दरबार भरविण्यात येणाऱ्या गणेश रेसिडेन्सी सोसायटी अध्यक्ष मंदार सहजे यांनी सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि सहकार दरबार संपन्न झाला .