पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेहमेळावा जस्ने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे ,माजी महापौर आझम भाई पानसरे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे सर्व माजी महापौर नगरसेवक ,नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 11 मे रोजी राजमाता जिजाऊ कॉलेज, लांडेवाडी, भोसरी या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली
हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध धर्मातील पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख धर्मगुरूंना सदर कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. सध्या केंद्रातील भाजप सरकार हे राज्यातील ज्या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपत आलेले आहेत असा राजकीय पक्षाला पुढे करून महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत तसेच प्रक्षोभक भाषणे करून हिंदू मुस्लिम मधील दरी निर्माण करण्याचे काम करताना दिसत आहे. समाजात अशांतता निर्माण होऊन समाजामध्ये भितीदायक वातावरण तयार करण्याचे काम भाजपच्यावतीने सुरू आहे.
केंद्रातील भाजप सरकार अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करून सत्तेचा दुरुपयोग करत आहेत हे सर्व जनता पाहत आहेत असे अजित गव्हाणे यांनी यावेळी सांगितले तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले ,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील सुज्ञ जनता अशा चुकीच्या गोष्टीला कदापि खतपाणी घालणार नाही जातीयवादी पक्ष व धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना जनता आगामी काळात त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच आदरणीय शरद पवार यांच्या 55 वर्षाच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये काम करीत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी आपले काम केलेले आहे आपल्या देशात विविध जाती धर्म पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार-प्रसार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता स्नेहमेळावा जशन ए ईद ए मिलाद या कार्यक्रमाचे आयोजन केले असून शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे
सदर पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह माजी शहराध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे ,महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट , माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर ,कार्याध्यक्ष फजल शेख, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख , माजी नगरसेविका शमीम पठाण तसेच अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी उपस्थित होते