शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात नव्या पोलीस आयुक्तांनी नुकताच पदभार स्विकारला. पहिल्याच दिवशी नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केल्यानंतर तक्रारदारांचं म्हणणं ऐकून न घेतल्यास आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हॉट्सअपवर करण्याचं आवाहन केलं आहे.
नागरिकांसाठी पोलीस आयुक्तांनी व्हाट्सॲप क्रमांक जाहीर केलाय. हा क्रमांक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आलाय. ‘पोलीस स्टेशनमध्ये जर तक्रार घेतली नाही, तर ती तक्रार 9307945182 या नंबरवर व्हाट्सअपवर करावी,’ असं फलकांवर नमूदही करण्यात आलं आहे.
Advertisement