शबनम न्युज | पिंपरी
जन संवाद सभा प्रत्येक आठवड्यात दोन वेळा घेण्यात यावी, अशी मागणी एम आय एम पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, जन संवाद सभा हि अत्यंत कौतुकास्पद संकल्पना असून या माध्यमातून शहरातील अनेक अडचणी नागरिकांना थेट मांडता येतात त्यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होते परंतु फक्त आठवड्यात सोमवारी सकाळी १० ते १२ दरम्यान घेण्यात येते यामुळे अनेकांना वेळेअभावी जण संवाद सभेत सहभाग घेता येत नाही शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात आठवड्यात दोन वेळा सोमवारी सकाळी १० ते १२ दरम्यान व गुरुवारी सकाळी १० ते १२ दरम्यान जनसंवाद सभा घेण्यात यावेत जेणे करून अधिकधिक नागरिकांना यात सहभाग घेता येईल व आपल्या समस्या सॊडवून घेता येतील तसेच शहर स्तरावर महानगरपालिकेत स्व. पवळे सभागृहात आठवड्यात एकदा आपल्या प्रमुख उपस्थिती मध्ये जण संवाद सभा आयोजित करण्यात यावी यामुळे शहर स्तरावरील अडचणीवर चर्चा होईल व त्या सोडण्यात सोपे होईल तरी आपण याची आपण दखल घ्यावी. असे हि सदर निवेदनात धम्मराज साळवे यांनी नमूद केले आहे.