शबनम न्युज | पुणे
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), येथे खास प्रेक्षकाग्रहास्तव आयोजित करण्यात आलेल्या अमर देवकर लिखित, दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ‘म्होरक्या’ आणि ‘परदा’ या लघुपटाचे स्क्रीनिंग प्रेक्षकांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या पार पडले.
स्क्रिनिंगनंतर ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी चित्रपट माध्यम आणि त्यामधून मांडण्यात येणाऱ्या विषयांचा खरपूस समाचार घेत ‘म्होरक्या’ चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि मांडणीविषयी आपले मत मांडले. चित्रपटाची गोष्ट ही फक्त त्यातील मुख्य पात्राची नसून ती जगातील ७०% लोकांची आहे आणि ती गोष्ट सर्वांपर्यंत पोहचायला हवी अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली.
‘म्होरक्या’मधील जिद्दीची गोष्ट गावोगावी जाऊन पोहचवायला हवी. शाळांमध्ये, मंदिर-मज्जीद-सभागृह जमेल त्या ठिकाणी ‘म्होरक्या’चे प्रदर्शन करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात अशी आशावादी भूमिका राजन खान यांनी यावेळी मांडली. ‘लोकल तेच ग्लोबल’ याचा पुरावा ‘म्होरक्या’ आपल्याला देतो आणि त्यासाठी आपले अभिनंदन असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कला दिग्दर्शक संतोष संखद, उद्योजक-लेखक शरद तांदळे, लोकमतचे संपादक संजय अवटे, दै. राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे, चित्रपट कार्यकारी निर्माते संजय ठुबे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, डॉ. सुयश शिंदे, समीर वंजारी, मितेश ताके, पिआयएफएफ प्रोग्राम डायरेक्टर विशाल शिंदे , दै. राष्ट्रसंचार सांस्कृतिक व प्रसिद्धी प्रमुख अश्विनी धायगुडे कोळेकर, ICAFF फेस्टिव्हल डायरेक्टर अमनदीपसिंग, राज्य चित्रपट विभाग प्रमुख – अक्षर मानव प्रवीण जावळे, इ. मान्यवर स्क्रिनिंगसाठी उपस्थित होते.
चित्रपट निर्मितीचे अनुभव तसेच चित्रपटाविषयीच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे लेखक, दिग्दर्शक अमर देवकर आणि टीमने दिले. स्क्रिनिंग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. विशाल पवार, अजित लोखंडे, सुरेश कुंभार, सुशांत इंगळे, रुपेश सांगळे, गणेश बुगडे, महेश बुगडे, अनिल भोसले, शुभम केंद्रे, दिग्विजय मोरे, क्रांती चिंचणे, मधुरा पानसे, राहुल देवकाते, आकाश छाया लक्ष्मण, स्वप्नील वटाणे, अक्षय होळकर यांनी सहकार्य केले.