राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र युवक उपाध्यक्षपदी विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांची महाराष्ट्र प्रदेशाच्या युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीचे पत्र मुंबई येथे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावतीने देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाचे युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रविकांत वरपे उपस्थित होते.
त्यांच्या निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
विशाल वाकडकर यांनी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी कार्यरत असताना पिंपरी-चिंचवड शहरात अनेक युवकांचे संघटन केले तसेच राष्ट्रवादीच्या बिकट काळातही विशाल वाकडकर यांनी राष्ट्रवादीला खंबीर साथ दिली त्यांनी आपल्या शहराध्यक्ष पदावर असतांना पिंपरी-चिंचवड शहरात अनेक आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते तसेच इंधन दरवाढ पेट्रोल डिझेल भाव वाढ घरगुती गॅस ची वाढती किंमत या विरोधात त्यांनी अनेक आंदोलने करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते भलीमोठी युवकांची फळी निर्माण करताना त्यांचे नेतृत्व गुण पक्षश्रेष्ठींनी हेरले व त्यांना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पदी विराजमान केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना विशाल वाकडकर यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य असणार आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार आहे, असेही विशाल वाकडकर यांनी सांगितले.