विश्व फालुन दाफा दिवस : ३० वे वर्ष
दिनांक १३ मे हा दिवस जगभरात “फालुन दाफा दिवस” म्हणून साजरा केला जातो. मानसिक तसेच शारीरिक स्वास्थावर झालेल्या आश्चर्यकारक परिवर्तनामुळे जगभरातील फालुन दाफा साधक, या साधनेचे संस्थापक गुरु ली होंगजी यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी विश्व फालुन दाफा दिवस फार उत्साहाने एकत्रित येऊन भव्य परेड द्वारे, तसेच त्यांना लाखो शुभेच्छा देऊन साजरा करतात. या वर्षी हि दिव्य साधना सार्वजनिक होऊन 30 वर्ष पूर्ण होत आहेत.
या निमित्ताने “फालुन दाफा” या साधना प्रणालीबद्दल ची माहिती देणारा हा लेख.
“फालुन दाफा” या प्राचीन साधना प्रणालीची शिकवण, गुरु ली होंगजी यांनी १३ मे १९९२ रोजी चीन मध्ये सार्वजनिक केली आणि त्यानंतर गेल्या ३० वर्षात, ११४ पेक्षा जास्त देशांमध्ये १० कोटीहून अधिक साधकांनी ही साधना आत्मसात केली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य, उत्तम आरोग्य आणि नैतिक गुणांचे संवर्धन करण्यासाठी फालुन दाफा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
फालुन दाफा (ज्यास फालुन गोंग देखील म्हटल्या जाते) ही एक मन आणि शरीर यांचा विकास करणारी एक उच्चस्तरीय प्राचीन साधना प्रणाली आहे. विश्वाची प्रकृती सत्य-करुणा-सहनशीलता या तीन तत्वांवर आधारित, फालुन दाफा सर्वप्रथम चीनमध्ये १९९२ साली श्री ली होंगजी द्वारा सार्वजानिक केला गेला. फालुन दाफा पासून होणाऱ्या मानसिक तसेच शारीरिक लाभामुळे काही वर्षातच ही पद्धती चीनची सर्वाधिक प्रसिद्ध साधना पद्धती बनली. आज जगातील ११४ हून अधिक देशात, १० कोटीहून अधिक साधकांनी या साधना अभ्यासाला आत्मसात केलेले आहे. या कार्यासाठी फालुन दाफा आणि याचे संस्थापक श्री ली होंगजी, यांना जगभरातून १२०० पेक्षा अधिक पुरस्कार आणि प्रशस्ती-पत्रांनी सम्मानित केलेले आहे. श्री ली होंगजी यांना स्वतंत्र विचारांसाठी सखारोव पुरस्कार तसेच ‘उत्कृष्ट आध्यात्मिक गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच चार वेळा ‘नोबेल शांती’ पुरस्कारासाठी देखील नामांकित करण्यात आले.
स्वास्थ लाभ :
फालुन दाफा मध्ये सौम्य आणि प्रभावी अशा पाच व्यायामांचा समावेश आहे. परंतु मनाची साधना व नैतिक गुणांची साधना यावर जास्त भर दिला जातो. नैतिक गुणांच्या विकासाने शरीरावर देखील व्यापक परिवर्तन होते. तसेच फालुन दाफा च्या नियमित अभ्यासाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास देखील मदत होते
फालुन दाफा मन आणि शरीराची एक परिपूर्ण साधना प्रणाली असून, यापासून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक लाभामुळे फार कमी वेळातच आश्चर्यजनक आरोग्य लाभ दिसून येतो. पुस्तक “Life and Hope Renewed – The Healing Power of Falun Dafa” मध्ये फालुन दाफा अभ्यासाद्वारे अनेक साधकांचे गंभीर तसेच प्राणघातक आजारांपासून मुक्त झालेले अनुभव संकलित आहे.
हे पुस्तक http://en.minghui.org/html/articles/2005/4/3/59184.html वरून फ्री डाउनलोड केले जाऊ शकते.
फालुन दाफा कसे शिकावे :
फालुन दाफा सरळ, सुबोध, तसेच प्रभावी आहे, यास दोन भागात विभागले गेले आहे :
१) मनाची साधना : फालुन दाफा मध्ये सर्वप्रथम व्यक्तिच्या नैतिक गुणांवर व मनाची साधना करण्यावर भर दिला जातो. मनाची साधना याचे अनेक पैलू आहेत जसे, दुर्व्यवहार सोडणे, लाभ तथा हानीची समज, मोहभावांचा त्याग, आणि अंततः विश्वाची प्रकृती सत्य-करुणा-सहनशीलता या तत्वांशी आत्मसात होणे.
फालुन दाफा अभ्यासाचे संकलन श्री ली होंगजी द्वारे लिखित निम्न पुस्तकात उपलब्ध आहेत :
फालुन गोंग : फालुन दाफा सिद्धांताविषयी चर्चा आणि अभ्यासाचे वर्णन फालुन गोंग पुस्तकांत दिले गेले आहे. व्यायाम कसे करावे हे छायाचित्रांद्वारे स्पष्ट केले गेले आहे.
जुआन फालुन : गुरु ली होंगजी यांचे नऊ उपदेशांचे संग्रह असेलेले जुआन फालुन हे एक मार्गदर्शक तसेच मुख्य पुस्तक आहे.
२) शरीराची साधना : फालुन दाफा मध्ये फारच साधे, सौम्य तसेच प्रभावी अशा पाच व्यायामांचा समावेश आहे :
व्यायाम १– बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन
ह्या व्यायामात, शरीरातील सर्व ऊर्जा वाहिन्या – सौम्य स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग पद्धतीने – उघडल्या जातात. जेणेकरून शरीरातील शक्तीचा प्रवाह सुरळीत होतो.
व्यायाम २ – फालुन स्थिर मुद्रा
हा उभा राहून चार स्थिर मुद्रेत केल्या जाणारा व्यायाम आहे जो ऊर्जेची पातळी वाढवितो आणि बुद्धीला जागृत करतो.
व्यायाम ३ – ब्रह्मांडाच्या दोन किनाऱ्यांचे छेदन
हातांना हलक्या रीतीने वर खाली करण्याचा हा व्यायाम ब्रह्मांडाच्या उर्जेचा उपयोग करून शरीर शुद्ध करतो.
व्यायाम ४ – फालुन अलौकिक कक्षा
संपूर्ण शरीरावरून हळूवारपणे हात ट्रेस करून करण्याचा हा व्यायाम, असामान्य परिस्थितीला सुधारतो.
व्यायाम ५ – दिव्या शक्ती सुधृढ करणे
ध्यानावस्थेत बसून करायचा हा व्यायाम शरीर आणि मनाला, परिष्कृत करतो.
व्यायाम व ध्यान करताना कोणत्याही मानसिक क्रियांचा उपयोग केल्या जात नाही. व्यायाम करताना मन रिक्त असल्यावर भर आहे.
फालुन दाफा ची पुस्तकें, व्यायाम निर्देश आणि अभ्यास स्थळांची अधिक माहिती या वेबसाइट www.falundafaindia.org वर उपलब्ध आहे. वरील पुस्तके, Video या वेबसाइट वरून निशुल्क Download करता येतील.
फालुन दाफा भारतात :
फालुन दाफाचा अभ्यास आपल्या देशांत अनेक वर्षापासून केला जात आहे. दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैद्राबाद, नागपूर, पुणे, कोलकाता तसेच इतर शहरांत देखील फालुन दाफाचा अभ्यास शिकविला जातो. फालुन दाफा देशभरांत अनेक शाळां तसेच कॉलेज मध्ये परिचित करण्यात आलेले आहे. तसेच वेळोवेळी याचा परिचय कार्पोरेट जगत, पुस्तक प्रदर्शन तथा अनेक मोठ्या प्रदर्शनामध्ये केला जातो.
पुण्यात देखील गेली काही वर्ष फालुन दाफा साधक या साधनेचा प्रचार करत आहेत, पुण्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी, उद्यानांमध्ये, Happy Street सारख्या Events मध्ये या साधनेचा प्रचार होत आहे. तसेच पुण्यातील साधक शाळा, कॉर्पोरेट विश्वातील कंपन्यांमध्ये जाऊन देखील हि साधना निशुल्क शिकवत आहेत.
२८ एप्रिल ते २ मे या काळात झालेल्या “पुणे बुक फेअर २०२२” मध्ये पुण्यातील फालुन दाफा साधकांनी या फेअर ला भेट देणाऱ्या सर्व पुणेकरांना या साधना पद्धतीचा परिचय करून दिला.
तसेच करोनाच्या काळापासून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्य साठी मागील २ वर्षापासून दर शनिवार आणि रविवार फालुन दाफा साधना पद्धतीचा परिचय हिंदी, मराठी , कन्नड , बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये Online वेबिनार द्वारे करून दिला जात आहे. हे वेबिनार संपूर्णत: निशुल्क आहेत.
अत्यंत दिव्य आणि परिणामकारक अश्या ह्या साधनेचा अभ्यास प्रत्येकाने केल्यास आरोग्य तसेच एकाग्रता आणि नैतिकता यांचा विकास होऊन या समाजात अमुलाग्र बदल घडू शकतो.
स्थळ, वेळ, तसेच दिशेचे बंधन नसलेला, सर्व संस्कृती एवं वयोगटासाठी लाभप्रद, नैतिक गुणांचा विकास, प्रभावी आरोग्य लाभ एवं आंतरिक विकास, तसेच ज्ञानप्राप्तीचा एक सुगम मार्ग असा हा फालुन दाफा जगभरात निःशुल्क शिकविला जातो.
आपणास शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना , नोकरीचे ठिकाणी कर्मचाऱ्यांना तसेच आपल्या कुटुंबामध्ये, सोसायटीत हि साधना एकत्रितपणे शिकण्याची इच्छा असल्यास साधक आपणास निशुल्क हि सेवा देतील.
संपर्क – आनंद पोफळे (७७२०००६४५३) कांचन अक्नुरवार (९००४२५०२९६) संदेश लोहार (८००७६०६१०५)
संकेत स्थळ : www.falundafa.org
फ्री वेबिनार नोंदणीसाठी (हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड, बंगाली भाषांमध्ये)) : www.LearnFG.org