शबनम न्युज | पुणे
रेडिओ चा पोस्टर बॉय अभ्यंग याच्या नवीन शो चा शुभारंभ मृणाल कुलकर्णीच्या उपस्थितीत अभिनेता, निर्माता असलेल्या अभ्यंगची कारकीर्द खरोखर वखाण्याजोगी आहे. अभ्यंगने आज पर्यंत अनेक चित्रपटानंमध्ये काम केले आहे. “वजनदार”, “सनई चौघडे”, “त्या रात्री पाऊस होता”, “लेजंड ऑफ भगतसिंग”, “सरीवर सारी”, “सातच्या आत घरात”, “दिवसेन दिवस”, “सावर रे” ह्या सोबत इतर अनेक अंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये काम केलेलं असून ऑस्कर करिता पाठविण्यात आलेली फिल्म “होऊ द्या जरासा उशीर”, मध्ये देखील काम केले आहे.
तब्बल १००० हुन अधिक जाहिरातीं मध्ये काम केलेला अभ्यंग अनेक लोकप्रिय म्युझिक व्हिडीओज मध्ये सुद्धा झळकला आहे. आजवर अभ्यंगला २४ सन्मान प्राप्त झाले आहेत. ज्या मध्ये “बालगंधर्व पुरस्कार”, “कलातीर्थ पुरस्कार” यांचा समावेश आहे.
DNA च्या इंडियाज मोस्ट हॅंडसम मेन यादी मध्ये २०१६ ते २०२० सलग ५ वर्षे, अभ्यंगचे नाव आले आहे. त्याच बरोबर TC Candler ह्या अमेरिकन मासिकाने “100 Most Handsome Men of the World ” च्या यादी मध्ये अभ्यंगला मनाचे स्थान दिले आहे.
नवा RJ, नवा शो
थोड्याच कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या मिर्ची लव्ह १०४.२ वर पुणेकरांची सकाळ अभ्यंग करायला सकाळी ७ ते १२ रेडिओचा पोस्टर बॉय अभ्यंग येत आहे. सोबत एक से एक धमाल आणि माहितीपूर्ण शो सेगमेंट्स घेउन, जसे कि “आज अभी इसी वक्त”, “फैशनग्राम”, “लव्ह मीटर”, तसेच “डिरेक्ट दिलसे” आदी.
याच बरोबर सर्व पुणेकरांचा फॅशन सेन्स, आणि ग्रूमिंग स्किल्स मध्ये कमालीचा बदल घडवून आणण्या करीत अभ्यंग प्रयत्नशील असणारे. लाईफ कोच, फॅशन कोच, ग्रूमिंग एक्सपर्ट, आर्टिस्ट, मॉडेल आणि आता पुण्याचा मोर्निंग शो होस्टच्या भूमिकेत लवकरच अभ्यंग झळकणार आहे.
पुणेकरांना हि खास भेट मिळणार आहे 16 मे रोजी तसेच मिर्ची Rj अभ्यंगचा हा नाव खास शो लाँच करण्या करता प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका (सोनपरी फेम) मृणाल कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
PREMIER SHOW – 18 May 22 रोजी अभ्यंगच्या पहिल्या शो वर सोहा अली खान, सुमित राघवन, सुधांशु पांडे, अश्मित पटेल, अनुजा साठे, श्रुती मराठे, फॅशन डिझायनर, निवेदिता साबू, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सौरभ गोखले, श्रेयस तळपदे अश्या एक से एक सेलेब्रिटीजची रांगच लागणार आहे.