शबनम न्युज | आळंदी
किकी बॉक्सिंग महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने दि.१५ /०५ /२०२२ ते १७ /०५ /२०२२ या दरम्यान द्वितीय कॅडेट व किक बॉक्सिंग खासदार चषक २०२२ राज्यस्तरीय स्पर्धेचे अहमदनगर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण ८१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी येथील एफ.वाय.बी.बी,ए (सी.ए) या वर्गातील कु. वैष्णवी जनार्धन वहिले हिने ५० किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक संपादन करून यश संपादन केले. या तिच्या यशासाठी महाविद्यालयाने सांमजस्य करार केलेल्या जिनियस करिअर अकॅडमी, आळंदी चे सचिव मा. श्री. दिपक गायकवाड व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विकास दिघे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले तसेच महाविद्यालयातील विविध शाखेतील विभागप्रमुख, सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.