शबनम न्युज | पिंपरी
निदर्शने करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीस जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) रोजी दुपारी दोनच्या सुमारास महाविर चौक चिंचवड येथे घडली आहे.
”प्रशासनाचा धिक्कार असो,लहुजी वस्ताद की जय..! राडा घातल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही आज राडाच घालयचा” अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार सुरज दरशथ कांबळे ( वय-25, रा. अनुसया कॉलनी दत्तमंदिर रोड , वाकड) व इतर 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये पारित केलेल्या आदेशाचा भंग व सी.आर.पी.सी 149 प्रमाणे दिलेल्या नोटीस मधील आदेशाचा भंग आरोपी यांनी केला आहे. आरोपींनी चिंचवड येथील महाविर चौक ते पुणेकडे जाणा-या रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करून त्यांच्या हातातील पिवळे झेंडे दाखवून “प्रशासनाचा धिक्कार असो, लहुजी वस्ताद की जय..! राडा घातल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही, आज राडाच घालयचा” अशा घोषणाबाजी करून निदर्शने केली.