शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी येथील नव महाराष्ट्र क्रिडांगण येथे मा.नगरसेवक संदीप वाघेरे व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.२१ मे २०२२ ते २७ मे २०२२ या काळामध्ये करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवर्य माऊली महाराज वाळूंजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ह्या नवमहाराष्ट्र क्रिडांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत स्पर्धेसाठी प्रथम परितोषीक १,११,१११/- रु.रुपये कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ, व्दितीय परितोषीक ५० हजार कै.सौ.सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ,व तृतीय परितोषीक २५ हजार कै.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ आणि चतुर्थ परितोषीक १५ हजार कै.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ असणार आहे.आणि तसेच ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी स्पर्धा (४० प्लस) होणार असून स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३५ हजार आणि व्दितीय परितोषीक २५ हजार रु. कै.योगेश पोपटराव वाघेरे, कै.अमोल हिरामण कुदळे व कै.सोमनाथ नंदकुमार खराडे यांच्या स्मरणार्थ असणार आहे. तरी या स्पर्धेत एकूण ६४ संघ दाखल झाले आहेत. सदर कार्यक्रम दि.२१ मे पासून ते २७ मे पर्यंत असणार आहे. आणि अंतिम सामना शुक्रवारी दि.२७ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.तसेच बक्षिस वितरण सोहळा शुक्रवार दि.२७ मे २०२२ रोजी रात्री ८ वाजता होईल.अशी माहिती वाघेरे यांनी दिली.
सदर स्पर्धेचे आयोजन संदीप बाळकृष्ण वाघेरे व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाचे नियोजन संदीप नाणेकर व राजेंद्र वाघेरे यांनी केले आहे. सदर उद्घाटन समारंभास गुरुवर्य माऊली महाराज वाळूंजकर मा.नगरसेवक संदीप वाघेरे, कामगार नेते आण्णा कापसे,स्विकृत नगरसेवक कुणाल लांडगे, सुभाष वाघेरे,अशोक नाणेकर,शांताराम वाघेरे,प्रवीण कुदळे,हरिष वाघेरे,एन.एस.यु.आय. उमेश खंदारे , अक्षय नाणेकर,श्रीकांत वाघेरे, आदी मान्यवर उपस्थित होते.