शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे ‘तरंग’ २०२१-२२ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दि. १८/०५/२०२२ रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर मा. श्री. अजित गव्हाणे, अध्यक्ष-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर, मा. श्री. प्रशांत जगताप, मा. महापौर, पुणे अध्यक्ष-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पुणे शहर, मा. श्री. विशाल तांबे, अध्यक्ष-श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, मा. श्री. वैभव तांबे, मानद सचिव-श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, मा. श्री. मयुर ढमाले, खजिनदार-श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, मा. श्री. राजीव पाटील, प्रशासकीय संचालक- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. प्रमोद इंगळे, प्राचार्य-ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ. हंसराज थोरात, प्राचार्य- शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, सौ. शितल पाटील, प्राचार्या- आदित्य स्कुल हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ.सोनाली बनपुरे व सौ.प्रज्ञा पेहरे यांनी केले तर सौ.वैष्णवी गुरव यांनी मान्यवरांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी लावणी, डान्स, भरतनाट्यम्, तबलावादन, नाट्य, मूक अभिनय व गीत गायन सादर केले ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा सांस्कृतिक तसेच महाविद्यालयांमध्ये वैयक्तिक चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.