शबनम न्युज | पिंपरी
शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व बिजलीनगर जेष्ठ नागरिक संघ, value Health यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विनामूल्य निसर्गोपचार व अक्युप्रेशर थेरपी शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मधुमेह, अर्धांगवायू, संधिवात, हृदयविकार, थायरॉइड, मानदुखी, कंबरदुखी, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, गुडघेदुखी, किडनीचे विकार, पित्त अपचन, निद्रानाश, पायदुखी, लिव्हरचे विकार, उतारवयात होणारे आजार या आजारांवर प्रभावी थेरपी असलेल्या निसर्गोउपचारांचे व ऍक्युप्रेशर थेरपीचे शिबीर बिजलीनगर येथील जेष्ठ नागरिक संघ कार्यालय येथे घेण्यात आले, या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला, यावेळी या शिबिराचे संयोजक असलेल्या जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांना विनामूल्य शिबिराचा लाभ देत असताना मनस्वी आनंद होत आहे,उतारवयात उदभवणाऱ्या आजारांसाठी नियमित व्यायाम आणि आहारावर बरोबर निसर्गोउपचारांची देखील गरज आहे हे या वेळी संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी नमूद केले. सलग ५ दिवस चाललेल्या या शिबिरासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, जेष्ठ नागरिक संघ सदस्य यांनी परिश्रम घेतले.