शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
दिनांक 27 ते 29 मे 2022 रोजी ‘सिंहगड इन्स्टिटयूट सोलापूर’ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवडचाचणी स्पर्धा नुकतीच नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड या ठिकाणी स्केटबोर्ड असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आली.
यावेळी राज्यातील विविध ठिकाणाहून खेळाडू येथे आले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशन पुणे चे अध्यक्ष तसेच नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट चे अध्यक्ष अमित गोरखे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा ही दिल्या. या स्पर्धेकरिता श्री सुनील शिंदे ( उस्मानाबाद ), विजय टेपुगडे ( पिंपरी चिंचवड) नागेश शेट्टीकर ( नाशिक ), प्रवीण सर ( यवतमाळ ),सचिन सर ( लातूर ), विनायक सर ( सांगली ), निखिल सर ( सोलापूर ), विशाल सर ( मुंबई ) हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम : यवतमाळ
द्वितीय : पिंपरी चिंचवड
तृतीय : सोलापूर
या स्पर्धेत विजयी खेळाडूंमध्ये नॉव्हेल स्कूल च्या आस्मि गायकवाड व पुनीत पाटील या खेळाडूंचा समावेश होता या दोन्ही खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.