शबनम न्युज | पुणे
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालय , पुणे येथील सहा. प्राध्यापक क्षितिज नाईकडे यांची आंतराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या DAAD
(Deutscher Akademischer Austauschdienst) अंतर्गत बर्लिन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड लॉ येथे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पीएच.डी.साठी फेलोशिप मिळाली आहे. भारतातील उमेदवारांना
बर्लिन मध्ये संशोधन करणेसाठीचा हा एक राजमार्ग आहे.
प्रा. क्षितीज नाईकडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या विल्सन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात कला शाखेत
पदवी घेतली आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या
विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सध्या ते सिम्बायोसिस विद्यापीठामध्ये पी.एच.डी. करत
आहेत. प्रा. नाईकडे हे वयाच्या तिशीमध्ये असूनही व्यावसायिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांच्या प्रवासाची एक प्रेरक यशोगाथा आहे. त्यांनी सिम्बायोसिस विधी महाविद्यालय पुणे इथे उपसंचालक (प्रशासन) या पदावरती काम केले आहे आणि सध्या ते विद्यार्थी च्या हितासाठी असणाऱ्या विभागात काम करतात. एक उत्कृष्ट शिक्षक आणि संशोधक असण्यासोबतच तो एक उत्तम वाचक, ट्रेकर आणि बॅडमिंटनपटू देखील आहेत.
DAAD हा कार्यक्रम भारत आणि जर्मनी मधील शैक्षणिक भागीदारी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
बजावत आहे तसेच सर्व शैक्षणिक स्तरांवर विद्वान विनिमय कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असतो. इंडो-जर्मन
पार्टनरशिप इन हायर एज्युकेशन कोऑपरेशन प्रोग्राम (IGP) या संस्थात्मक स्तरावर इंडो-जर्मन शैक्षणिक सहकार्याला चालना देणारा एक उपक्रम आहे. हा कार्यक्रम जर्मन फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (BMBF) आणि भारतीय शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे प्रायोजित केला आहे, जे अनुक्रमे जर्मन शैक्षणिक विनिमय सेवा (DAAD) आणि भारतीय विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे प्रशासित आहेत.
बर्लिनमधील वास्तव्यादरम्यान प्रा. क्षितिज नाईकडे त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधावर संशोधन सुरू ठेवतील. ते
व्यवसाय आणि अर्थशास्त्र विभागात होस्ट केले जातील आणि त्यांचे प्रशिक्षक प्रा.डॉ. क्लेमेन्स आर्ट्स
असतील. भारतातील सूक्ष अर्थकारण चे राजकारण – महाराष्ट्र राज्याचा विशेष संदर्भ हा त्यांचे पी. एच. डी. चा विषय आहे. संपत्तीच्या केंद्रीकरणाच्या समस्या मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करतात
आणि उत्पन्नातील असमानतेची दीर्घकाळ चाललेली समस्या पद्धतशीर सोडवण्यासाठी सूक्ष्म वित्तपुरवठा
महत्त्वाचा घटक आहे तसेच बांगलादेशातील यशस्वी ग्रामीण बँक मॉडेलच्या आधारे भारतातील विद्यमान
सूक्ष्म वित्त संस्थांमधील उणिवा बळकट करणे हा त्यांच्या अभ्यासाचा उद्देश आहे. DAAD चा एक भाग म्हणून, ते भारतातील संशोधन क्षेत्रांबद्दल परस्पर जागरूकता बळकट करणे आणि संशोधनाच्या विविध क्षेत्रांमध्ये इंडो जर्मन सहयोग विस्तारणे , तसेच चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात व्यस्त राहणे ही त्यांची मुख्य उद्दीष्ठे असतील . ही संधी आंतरराष्ट्रीय मानकांसह संशोधन कौशल्य विकसित करण्यास आणि त्यांचे दर्जेदार लिखाण पुढे नेण्यास मदत करेल. जी कल्पना सार्वत्रिक आणि
टिकाऊ आहेत ती पुढे नेणेचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे, ही संधी प्राध्यापक नाईकडे यांच्या प्रबंधाचा
अधिक विकास करून अंमलबजावणी करण्यायोग्य मॉडेलमध्ये शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या विविध
पैलूंची संवाद साधण्यास मदत करेल.
सिम्बायोसिस च्या वतीने प्रा. क्षितिज नाईकडे यांच्या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे आणि
त्यांच्या शैक्षणिक प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत . ही उल्लेखनीय कामगिरी संस्थेतील सर्व विद्यार्थी
आणि प्राध्यापक सदस्यांसाठी प्रेरणादायी आहे तसेच सिम्बायोसिस अंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या
आंतरराष्ट्रीयीकरणाच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे.