- जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या सरकारकडून लोकांचा भ्रमनिरास – आ. महेश लांडगे..
- महाविकास आघाडी सरकार विरोधात शहर भाजयुमोचे आकुर्डीत निषेध आंदोलन…!
शबनम न्युज | पिंपरी
पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी व्हावी, अशी जनतेची माफक अपेक्षा होती. जनतेच्या भावनांचा विचार करीत केंद्रातील मोदी सरकारने देशभरात पेट्रोलमागे साडेनऊ आणि डिझेलमागे सात रुपयांची कपात करून जनतेला दिलासा दिला. त्याचबरोबर राज्यांना ही कपात पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची सूचनादेखील केली. भाजपशासित राज्यात ही सवलत जाहीर झाली. महाराष्टात मात्र, तिघाडी सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करून, स्वतःची पाठ थोपटण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. घोषणा होऊन काही दिवस उलटले. केंद्राच्या शुल्क कपातीचा फायदा नागरिकांना मिळूच न देण्याचा चंगच जणू या राज्यातील तिघाडी सरकारने बांधला आहे. त्यांचा बुरखाफाड करण्याचा विडा राज्यभरात भाजयुमोने उचलला आहे. त्याची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरात झाली. जोवर जनतेला पेट्रोल-डिझले-गॅस दर कपातीचा दिलासा मिळत नाही, तोवर राज्यभरात मंत्र्यांना फिरकू देणार नाही, त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही?, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुक्यात युवा मोर्चाचे कार्यकर्ते जनतेचा आक्रोश मांडण्याचे राज्यव्यापी आंदोलन करतील आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर आणतील, असा घणाघात भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकावर केला आहे.
मोदी सरकारपाठोपाठ राज्य शासनाने पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कपात केल्याचे जाहीर केले. त्यानुसार राज्यातील विविध शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार याची माहिती तातडीने जाहीर झाली. त्यामुळे राज्य शासनाला किती महसुलावर पाणी सोडावे लागणार, हेही सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात राज्य सरकारने कोणतीही दरकपात केली नाही. या विरोधात आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर भाजयुमोच्या वतीने आज बुधवारी (दि. २५) रोजी आकुर्डीतील तहसील कार्यालावर आंदोलन करण्यात आले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, शहर भाजयुमो अध्यक्ष संकेत चोंधे, प्रदेश सचिव अमृत मारणे, गणेश कुटे, जिल्हा सरचिटणीस दिनेश यादव, सलीम शिकलगार, समीर जावळकर, गणेश जवळकर, उदय गायकवाड, शिवराज लांडगे, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे, प्रथमेश सपकाळ, दिगंबर गुजर, जयदीप कर्पे, पंकज शर्मा, अनिकेत शेलारे, अजय मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. महेश लांडगे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने तिजोरीवर मोठा बोजा येत असताना देखील पेट्रोल-डिझेल कर-कपातीचा चांगला निर्णय घेतला. राज्य सरकार फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची भूमिका घेतयं. जनतेची दिशाभूल अनं फसवणारी, विश्वासघात करणारी घोषणा राज्य सरकारने केलीयं. एक रुपयाची देखील सूट अथवा कपात न करता किमती आहे त्याच ठेवल्यात. जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारकडून लोकांचा भ्रमनिरास झाला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले, केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल डिझलेवरील कर कमी केले. दुसरीकडे तिघाडी सरकार दारूवर ५० टक्के सूट देते. कारण सरकारला दारुड्याची चिंता आहे. सत्तेसाठी लाचार झालेले हे सरकार ज्यांच्या जीवावर सत्तेत बसलेत त्यांचा विश्वासघात करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून पेट्रोल-डिझेलवर पन्नास टक्के सूट देऊन जनतेला दिलासा द्याव. जोपर्यंत ही दर कपात होत नाही, तोपर्यंत झोपलेल्या तिघाडी सरकारचे सोंग उघडे पाडण्यासाठी युवा मोर्चाचा संघर्ष सुरुच राहील.
यावेळी कार्यकर्त्यांनी ” गली गली मे शोर है, महाविकास आघाडी चोर है”, आघाडी सरकारच करायचं काय? खाली डोकं वर पाय ..!” अशा घोषणा दिल्या.