शबनम न्युज | मुंबई
मुंबई कार्डिलिया क्रूझ ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लिन चिट दिली आहे.त्यामुळे या सर्व प्रकरणावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आर्यन खानला कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी प्रमुख आरोपी करण्यात आले होते. त्यासंदर्भात आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात देखील होता. मात्र, आता आर्यन खानला क्लीनचिट दिल्यामुळे एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सरकारने समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगितले आहे.
प्रसारमाध्यमांनी आर्यनला क्लीन चीट देण्यात आल्यासंदर्भात विचारणा केली असता समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी पत्रकारांना सॉरी असं म्हटलं. “सॉरी, मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर बोलू शकत नाही. यासाठी तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला,” अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.