शबनम न्युज | पुणे
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाइन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षांबाबत मोठा विधान केला आहे.
कोरणाचे संकट आता निवळलंय, त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा यापुढे ऑफलाईन घेण्यात येणार आहेत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
Advertisement
तसेच येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 सप्टेंबर पासून करण्याचा प्रयत्न असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अनेक कॉलेजमध्ये मराठीतून अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. इंजिनिअरिंगच्या मराठी अभ्यासक्रमाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे.