शबनम न्युज | पिंपरी
प्रभाग क्र. १५ मधील गंगानगर येथील प्रलंबित रसत्याचे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी निखिल उमाकांत दळवी (संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी पिंपरी चिंचवड़ मनपा आयुक्तांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्र. १५ मधील गंगानगर येथील रसत्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सुरु आहे. सदर काम हे संत गतीने म्हणजेच एकदम हळू हळू सुरु आहे, कधी कधी तर दोन दोन दिवस काम बंद असते या रसत्याच्या सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याच्या कामा मुळे स्थानिक रहिवासी नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गंगानगर मधील एक रस्ता सदर कामा मुळे बंद आहे नागरिकांना आपली दोन चाकी चार चाकी वाहाने घरा पासून लांब पार्किंग करवी लागत आहेत परिसरातील जेष्ठ नागरिक लहान मुले व सर्वच नागरिक यांना येन्या जान्या साठी व आपली चार चाकी वाहने ने आन करण्यासाठी मोठी कसरत करवी लागत आहे गेले एक महिन्या पासून एक रस्ता काम सुरु असल्या मुळे बंद केला आहे सदर काम कधी पूर्ण होणार हा प्रशन आत्ता स्थानिक रहिवासी नागरिकांच्या समोर उभा राहिल आहे.
सदर रसत्याचे खोद काम करताना एक बाजूने काम सुरु करावे व दुसऱ्या बाजूचा रस्ता हा नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरु ठेवावा असे स्थानिक नागरिकांनचे म्हणणे होते पण असे न करता संपूर्ण रास्ताचे खोदुन काम सुरु केले त्या मुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे नागरिकांना या सुरु असलेल्या रसत्याच्या कामा मुळे रसत्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजू कड़े जायचे असेल तर मोठा वळस मारूंन जावे लागत आहे या कामाला गती नाही बरेच दिवस झाले हे काम हळू हळू सुरु आहे गंगानगर परिसरातील स्थानिक रहिवासी नागरिक या रसत्याच्या प्रलंबित सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामा मुळे त्रस्त झाले आहेत तरी आत्ता काम सुरु असलेल्या ठिकाणचे रसत्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व रसत्याची एक बाजू नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरु करुण द्यावी व गंगानगर मधील संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे, असे हि सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.