शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ साठी पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील खेळाडू मनीषा राठोड या विद्यार्थिनीची महाराष्ट्राच्या टीम मध्ये निवड झाली आहे. मनीषा राठोड हि महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर या शाळेतील शिक्षिका सोनाली जाधव यांची सहाय्यक व्यवस्थापक महाराष्ट्राच्या संघासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कला, क्रीडा विकास प्रकल्पांतर्गत खेळणारी कु. मनीषा राठोड ही महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या कबड्डी संघात प्रथमच पात्र ठरली आहे. ऑलराऊंडर म्हणून कब्बडी साठी 19 वर्षाखालील मुली गटात महाराष्ट्र संघात निवड झालेली महापालिकेची ती प्रथम खेळाडू आहे.
हरियाणा साठी मुलींचा कबड्डी संघ 1जून ला रवाना होणार आहे. चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्स चे आयोजन दिनांक 3 ते 13 जून 2022 या कालावधीत हरियाणा येथे होत आहे.
मनीषा राठोडला बन्सी आठवे यांचे कोच म्हणून मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी श्रीमती अनिता केदारी व माध्यमिक विद्यालय थेरगाव चे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी मनीषा राठोड यांचे अभिनंदन केले. निवड झालेल्या सोनाली जाधव यांची कर्नाटक मधील 2019-20 साली राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली होती. तेव्हा महाराष्ट्र राज्य संघ कांस्यपदक विजेता ठरला होता.