शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
सामाजिक आशयाचे लघुपट निर्माण करून सामाजाचे प्रबोधन करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भावना लघुपटाचे दिग्दर्शक, लेखक सीए अरविंद भोसले यांनी सांगितले.
महिला स-शक्तिकरण हा सामाजिक संदेश देणारा स्टोरी ऑफ वर्किंग वूमन “भावना” या लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पिंपरी चिंचवड शहरातील हा एकमेव लघुपट ठरला आहे. या मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल “रेडबड मोशन पिक्चर्स” यांच्या वतीने या लघुपटातील कलाकारांचा “सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बर्थडे आहे भावाचा या प्रसिद्ध गाण्याचे गायक शेखर गायकवाड, उद्योजक राहुल भोसले, सतीश दिसले, युवराज तावरे, मनोज गायकवाड, भावना मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पिया कोसुंबकर, सह अभिनेत्री पूजा वाघ, अर्चना गुप्ता, सहकलाकार प्रसाद खैरे, रोहित पवार, चिराग चौधरी, अक्षय थापा, अर्णव नारखेडे, अक्षय दरे, बालकलाकार अर्णव चावक, छायाचित्रकार जयजीत मोरे , विनायक कदादि आदी मान्यवर व कलाकार उपस्थित होते.
“भावना” हा लघुपट पाहून समाजाने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास खऱ्या अर्थाने हा लघुपट बनवण्याचा उद्दिष्ट साध्य होईल असे मत सीए भोसले यांनी व्यक्त करून “भावना” या लघुपटाला सर्व प्रेक्षक वर्ग व माध्यमांनी भरभरून दिलेल्या प्रसिद्धी व प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “भावना” लघुपटातील सर्व कलाकारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.