शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.31 ) सोडतीद्वारे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. याबाबत चेतन बेंद्रे (कार्यकारी अध्यक्ष, आप पिंपरी चिंचवड) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीच्या आज झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचे आम्ही स्वागत करतो. केंद्र आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीमकोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय ही सोडत झाली असली तरी शहरातील ओबीसींना आम्ही या निवडणुकीत नक्की न्याय देणार. आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरात पूर्ण ताकदीने उतरणार असून महापालिकेच्या सर्व १३९ जागा लढणार आहे. या निवडणुकी बाबत आम आदमी पार्टीची रणनीती आणि भूमिका येत्या ५ जून रोजी होत असलेल्या स्वराज्य निर्धार मेळाव्याद्वारे करण्यात येईल.