शबनम न्युज | पिंपरी
आदिवासी मुलींचे शिक्षणांत प्रमाण अत्यंत अल्प असते. आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणांच्या कक्षा रुंदावत नाही. परिस्थितीशी दोन हात करत स्वप्नाला गवासणी घालण्यासाठी अभ्यासाची कास धरत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठातून पदवी पूर्ण करून पहिल्याच प्रयत्नात क्षितिजा बोथीकर या मुलींने IIT सारख्या संस्थेत प्रवेश मिळवला.संपूर्ण भारतातून फक्त 12 विद्यार्थी या IIT मध्ये उत्तीर्ण झाले असून क्षितिजा बोथीकर त्यापैकी एक आहे. IIT सारख्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी क्षितिजाला आर्थिक मदतीची गरज असताना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख व कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे यांच्या माध्यातून व स्वर्गीय प्रणव गावडे सामाजिक संस्थेच्या वतीने ८०,०००/- रुपये शैक्षणीक फी साठी मदत मिळवून दिली.
राजकीय क्षेत्रांतून ही मदत करणं शक्य नसल्याने सामाजिक क्षेत्रांतून ही मदत करणं अधिक सोयीस्कर होतं. आरोग्य क्षेत्रांतील विविध उपक्रम घेणारी चिंचवडगावातील स्वर्गीय प्रणव गावंडे सामाजिक संस्था या वर्षी या आदिवासी मुलीचा शिक्षणांचा खर्च उचलणार आहे.
शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळ, जुलूस कमिटी, जयंती उत्सव कमिटी सारख्या अनेक संस्था पिंपरी चिंचवड भागांत आहेत त्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरजवंत मुलांना शैक्षणिक दत्तक घेतले गेले तर अश्या अनेक दुर्लक्षित घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेण्यास मदत मिळेल व मदतीची ही मोहीम सुरू होईल असे आव्हान यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान भाई शेख यांनी केले.