शबनम न्युज | पिंपळे सौदागर
पिंपळे सौदागर मधील मनपा वतीने बांधण्यात आलेल्या अत्याधूनिक विविध खेळ उदा. क्रिकेट, फुटबॉल, रनिंग, स्केटिंग, बास्केट बॉल आदी खेळ प्रकार असलेल्या कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले .
या क्रीडांगणासाठी मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व शितलताई नाना काटे यांनी पिंपळे सौदागर मध्ये असे अत्याधुनिक क्रीडांगण व्हावे, याठी प्रयत्न केले होते व ते आज पूर्ण होवून नागरिकांसाठी खुले कण्यात आले.
या अत्याधुनिक क्रीडांगण उदघाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, अति. आयुक्त विकास ढाकणे, अति. आयुक्त. जितेंद्र वाघ, मा. महापौर संजोगजी वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे नगरसेवक शत्रुघ्न काटे, मा. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदिप काटे, अनिताताई काटे, कैलास कुंजीर, निलेश काटे, मा. नगरसेवक शंकरभाऊ काटे व परिसरातील सोसायटी मधील नागरिक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.