शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिटणीस पदी राष्ट्रवादीचे रशीद सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र हे राष्ट्रवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, लोकनेते शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण पिंपरी-चिंचवड शहरात पक्षसंघटन शक्तिशाली व मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराल, अशी अपेक्षा अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे प्रवक्ते, कार्याध्यक्ष फजल शेख, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.