पिंपरी चिंचवड
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे विरोधात आता पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने युवक अध्यक्ष इमरान शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मागील आठवड्यात एका न्यूज चैनल वर डिबेट करताना भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते याचे पडसाद जगभर उमटले आपल्या भारत देशा विरोधात अनेक मुस्लीम देशांनी निषेध नोंदविला. केंद्रातील सत्ताधार्यांना मुस्लिम देशांची माफी मागावी लागली,
भाजप पक्षाने नूपुर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले असले तरी त्यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे देशभरातून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहरातही नुपूर शर्मा यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे