पिंपरी चिंचवड :
महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत संगीत अकादमीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त निगडी येथील संत तुकाराम महाराज व्यापार संकुल येथे महापालिकेच्या संगीत अकादमीमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे नातू गायक विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांना तबला साथ संतोष साळवे, हार्मोनियम साथ उमेश पुरोहित तर तानपुरा साथ नीलिमा बोरकर यांनी दिली. कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, माजी क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर, समीर सूर्यवंशी यांच्यासह संगीत विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.
Advertisement