शबनम न्युज | अमरावती (वृत्तसंस्था)
आज अमरावतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी विधवांसोबत तसेच वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली. या वटपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या उखाणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या उखाणा चांगलाच गाजला आहे. त्या म्हणाल्या कि, ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास,’ असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा गजर केला. यावेळी उपस्थित जेष्ठ महिलांनी सुप्रिया सुळेंना व सदानंद यांना दीर्घयुष्य लाभो असे आशीर्वाद दिले. सुप्रिया सुळेंनी साजरी केलेली ही वटपौर्णिमा समाजासमोर एक नवा आदर्श ठेवल्याचे बोलले जात आहे.
Advertisement