शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने दिनांक १८ ते २६ जून या कालावधीत सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान संपूर्ण शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी इम्रान शेख म्हणाले कि, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक मोठ-मोठे कारखाने, उद्योग, व्यापार बंद पडले असून, लाखोंच्या प्रमाणात तरुण नोकरीच्या शोधात गंटागल्या खात आहेत. देशात बेरोजगारी वाढत असल्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत, तसेच रस्त्यावर यायची वेळ आली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवडच्या वतीने दिनांक १८ ते २६ जून २०१२ या कालावधीमध्ये सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या बेरोजगार नोंदणी अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९६०७४११०१० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तसेच या मेल आयडीवर आपली माहिती पाठवून सुशिक्षित बेरोजगार अभियान नोंदणी करायची आहे.