शबनम न्युज | भोसरी
भोसरीतील आदर्श शिक्षण संस्थेच्या बाल- प्राथमिक- माध्यमिक विभागात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलांच्या पायघड्या -रांगोळ्या घालुन जोरदार स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार १५ जून २०२२ रोजी शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे प्रशालेत प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या आवडत्या डोरेमॉनने मुलांच्या हातात हात देऊन,नाचुन मुलांचे मनोरंजन केले. तर शाळेचा पहिला दिवस फोटोफ्रेम मध्ये उभे राहुन मुलांनी आवडीने फोटो काढुन घेतले.
पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विविध कौशल्य, गाणी, गोष्टी यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा साहित्य यांची मांडणी करुन बाल जत्रेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या सर्व उपक्रमांत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभागी होऊन आपला वेळ व्यतीत केला. फार दिवसांनी वर्ग मित्राच्या सोबतीने मुलांनी आनंदाने शाळेचा पहिला दिवस साजरा केला.
पालक प्रतिनिधीं हस्ते मुलांना शासकीय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी रूपाली कविटकर,रोहीणी गारूडकर,शीला आगरकर तुषार भुजबळ,भरत राणे,अंजली नखाते व सर्वच पालकवर्ग उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रविण बारसे ,पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.सुषमा कुंभार ,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.प्रियांका बारसे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.वंदना लढे यांनी विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे रत्नाकर गायकवाड व रफीक तांबोळी यांनी केले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपमुख्याध्यापिका चित्रा औटी यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले