शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर मनसे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड शहरात राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर उपाध्यक्ष राजु सावळे यांच्या वतीने जुनी सांगवीत मुळा व पवना नदी पात्र जवळ देशी वृक्ष वड, पिंपळ, चिंच, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरअध्यक्ष राजु भालेराव यांच्या वतीने जनहित व विधी कक्ष विभागाच्या मुख्य हॉस्पिटल YCM इथे लहान मुलं व वृद्ध यांना फळ वाटप करण्यात आले. तसेच अनिता ताई पांचाळ व आकाश पांचाळ व मित्रपरिवार यांच्या वतीने काळेवाडी भागामध्ये पाचपीर चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास, पन्नास जणांनी रक्तदान केले. तर माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले -मराठे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 सद्गुरु दत्त उद्यानामध्ये महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विशाल मानकरी व सुजाता अरुण काटे व सगिताताई देशमुख यांच्या वतीने पीनगर हनुमान मंदिरामध्ये महा आरती चे नियोजन करण्यात आले, या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. हेमंत भाऊ डांगे व विद्यार्थी सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने चिंचवड गावातील श्री राम मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली. काशिनाथ खजूरकर- स्वामी यांच्या वतीने पिंपरी मोरवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सुमित कोल्हापुरे व स्वामी यांच्या वतीने विद्यार्थी सेनेच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटल मध्ये वृद्धांना व लहान मुलांना व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. सचिन शिंगाडे व विनोद भंडारी यांच्या वतीने किवळे -रावेत या प्रभागात व्यापारी वर्गाला रक्तदान तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थी सेना सचिव अक्षय नाळे यांनी चिंचवडे नगर येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देखील देण्यात आली तसेच विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी यांनी वृक्षारोपण चा कार्यक्रम केला.
यावेळी शहरातील पदाधिकारी उपशहर अध्यक्ष, राजू सावळ, बाळा दानवले , विशाल मानकरी , विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे,दत्ता देवतरासे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, सचिव अनिकेत प्रभू, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी ताई बांगर, अनिताताई पांचाळ, सचिव सीमाताई बेलापूरकर, जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष राजू भालेराव, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष, सुशांत जी साळवी, राजेशजी अवसरे, नाथा भाऊ शिंदे, सचिन पगार, सुरज जाधव, देवेंद्र निकम, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, प्रभूने ताई शेख, संघटक विनोद भंडारी , परमेश्वर चिल्लरगे, अक्षय नाळे, सोमनाथ स्वामी, महेश बडगुजर, शहर संघटक पुनीत गळीतकर, नारायण पठारे, शैलेश तलाठी, सागर सोनटक्के या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली व कार्यक्रमाचे नियोजन केले.