शबनम न्युज | मुंबई
अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या विरोधात समान उमेदवार उभे करण्याचे मान्य केले. आज टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय पक्षांची संयुक्त परिषद बोलावली, ते म्हणाले, “आज अनेक पक्ष येथे होते. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही एकच उमेदवार निवडू, प्रत्येकजण या उमेदवाराला आमचा पाठिंबा देईल,असे यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या कि, “आम्ही इतरांशी सल्लामसलत करू, ही चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनंतर एकत्र बसलो, आणि आम्ही ते पुन्हा करू,” असे मुख्यमंत्री बॅनर्जी पुढे म्हणाले. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणुकीसाठी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा ही ऑफर नाकारली. आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन यांनी सांगितले की, बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांचीही संभाव्य विरोधी उमेदवार म्हणून नावे सुचवली आहेत.
I sincerely appreciate the leaders of opposition parties for suggesting my name as a candidate for the election of the President of India, at the meeting held in Delhi. However I like to state that I have humbly declined the proposal of my candidature. pic.twitter.com/j9lTFFJMUX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 15, 2022
शिवसेना, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जेडी(एस), आरएसपी, आययूएमएल, आरएलडी आणि जेएमएमचे नेते या बैठकीला उपस्थित होते. 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जेडीएसचे एचडी देवेगौडा आणि एचडी कुमारस्वामी, सपाचे अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आदी नेत्यांचा समावेश होता.